अधिवेशनामधल्या याच भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा जो हप्ता असेल तो लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हा हप्ता दिला जाणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि याशिवाय ज्या ज्या योजना आम्ही सुरु केलेल्या आहेत त्यातली एकही योजना बंद होऊ देणार नाही असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलं