बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास काही केल्यापुढे सरकत नाहीये. या प्रकरणामध्ये ज्याच्यावर सगळ्यात जास्त आरोप होतायेत त्या वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी नेमका संबंध आहे का याची चौकशी होणं तर दूर राहिलं पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यातले तीन आरोपी सुद्धा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत. जिथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली त्या खंडणी प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू झाली आहे. हत्या प्रकरणाची सिट चौकशी मात्र थंड बस्त्यातच आहे. या प्रकरणी सातत्यानं आरोप होत असलेले धनंजय मुंडे यांनी मात्र आज या प्रकरणी मीडिया ट्रायल होत असल्याचा दावा केलाय.