होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचा सराव करण्यास दिलेल्या परवानगीविरोधात आज डॉक्टर्सचा संप आहे... इंडियन मेडिकल असोसिएन आणि महाराष्ट्र सिनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनने संप पुकारलाय... यांच्याबरोबर आता केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्डनेही संपामध्ये सहभागी झाले आहेत...जेजे हॉस्पीटल आणि संभाजीनगरासह राज्यभर संप सुरू आहे... संप काळात सरकारी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार असले तरी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे... जळगाव मधील 2 हजार 500 डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला असून मेडिकल हब म्हणून ओळख असलेल्या जळगाव मधील हजारो डॉक्टर आज संपावर गेल्याने वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील राज्यव्यापी आंदोलनाला ठाणे डॉक्टरांचा समर्थन दिलंय...