ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केलाय.2 सप्टेंबर 2023 रोजी जालन्याच्या अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जमागे शरद पवारांच्या एका आमदाराचा हात आहे. असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केलाय, 1 सप्टेंबरच्या रात्री एक बैठक झाली त्यानंतर अंतरवालीत सगळ्यांच्या घरावर दगड भरून ठेवण्यात आली.पोलिसांनी जरांगे पाटलांना समजवायला गेल्यानंतर या गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली असा खळबळजनक दावा देखील केलाय.