नांदेडच्या रिसनगावमध्ये मराठा ओबीसी वाद पेटलाय. दोन गटात हाणामारी झालीय यात तीन जण जखमी झालेत. याच गावातील शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय, मनोहर धोंडेंच्या आश्रम शाळेतून काही दिवसांपूर्वी मराठा पालकांना याच रागातून दाखला काढण्यासाठी अर्ज केला होता, त्यानंतर ओबीसी समाजाने देखील मराठा शिक्षण संस्थेतील शाळेतून पाल्यांना काढून घेण्याचा निर्णय घेतला होता .. याबाबत तोडगा काढण्यासाठी आज ओबीसी समाजाची गावात बैठक होती.या बैठकीदरम्यान मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले .. त्यांच्यात वाद होऊन हानामारी झाली ..