मुंबईत एकनाथ शिंदेंचा आता राज ठाकरेंना धक्का देण्यास सुरूवात.मनसेच्या माजी नगरसेवकांना गळाला लावणे सुरू.मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत हे शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी अंधेरीत पार पडणार पक्षप्रवेश सोहळा.ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्याही एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आता राज ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनाही पक्षात घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येतंय