सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कालपासून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यास सुरुवात आहे.या महामार्गावर एकमेव असलेल्या कशेडी बोगद्याची त्यांनी पाहणी केली. कशेडी बोगद्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि अंतर देखील वाचणार आहे. दरम्यान कशेडी बोगद्याला गळती लागत असल्याने तो धोकादायक ठरु शकतो.पण धोका निर्माण होऊ नये यासाठी गळती थांबवण्याचे प्रयत्न केले जातील असं शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितलं..