शिवसेना फोडण्याचा डाव नेमका कुणाचा? एकनाथ शिंदेंचा की संजय राऊतांचा? शिवसेना हायजॅक करण्याची आयडिया कोणाची? एकनाथ शिंदेंची की संजय राऊतांची? सेनेच्या आमदारांचा पाठिंबा कुणाला? एकनाथ शिंदेंना की शिवसेनेला? या तिन्ही प्रश्नांचं सरळ सरळ एकच उत्तर तुम्ही द्याल. एकनाथ शिंदे शिवसेना फुटून तीन वर्ष झाल्यानंतर आज मी हे प्रश्न का विचारतीये? हे प्रश्न विचारायला कारण आहे गुलाबराव पाटलांनी केलेलं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मते संजय राऊत हेच शिवसेना फुटीचे मास्टर माइंड होते. पण आमदारांनी विरोध केला आणि ते एकनाथ शिंदेंसोबत येऊ शकले नाहीत.