लातूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास दीडशे ते दोनशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. यामध्ये सोयाबीन, ऊस, मूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.