मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवलं. याबाबत एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न विचारला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.