नवी मुंबईशी जोडणारा महत्वपूर्ण असलेल्या अटल सेतूवरनं वर्षभरात ब्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार वाहनांनी प्रवास केलाय. गेल्या वर्षी तेरा जानेवारी पासून हा मार्ग खुला झाला होता. या वर्षभरात दर दिवशी सरासरी बावीस हजार आठशे चौदा वाहनांनी प्रवास केलेला आहे. MMRDA च्या सत्तर हजार वाहनांच्या लक्ष्यापासनं मात्र अजूनही हा महामार्ग दूरच आहे. महामार्गाचा वापर करत अनेकांनी लाभ घेतलेला आहे.