पालघरमध्ये मकर संक्रांती निमित्तानं मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या सातिवलीच्या शिवमंदिरात जिल्ह्यातली पहिली यात्रा भरते. या सातिवली देवस्थानचे मुख्य वैशिष्ट्य आणि आकर्षण ते म्हणजे इथं असलेली नैसर्गिक गरम पाण्याची कुंड. कुंडातील पाणी आरोग्यवर्धक असल्याची श्रद्धा असल्यामुळे या गरम पाण्याच्या कुंडामध्ये अंघोळीसाठी मोठी गर्दी होते.