स्वारगेट बस डेपो मध्ये अत्याचार करून फरार झालेल्या दत्ता गाडे याला पकडण्यात यश आलेलं आहे. आरोपी गाडे हा त्याच्याच गुणाट या गावामध्ये लपून बसलेला होता. त्याला पकडण्यासाठी कालपासून दीडशे पोलिसांची फौज शोध घेत होती. उसाच्या शेतामध्ये ड्रोन सुद्धा तपास सुरु होता. अखेर रात्री एक च्या सुमारास गावामधील प्राध्यापक गणेश गवणे यांनी गाडीला एका मैदानामधून जाताना पाहिलं. त्यावेळी आरडाओरड करत गवणे यांनी गाडीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक करून जेरबंद केलेला आहे.