पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्यास स्थगिती देण्यात आल्याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला आहे. तरी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाहीये. शाळा सुरु व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे हिंदी भाषेच्या सक्तीबाबत शाळा आणि पालकांमध्ये संभ्रम कायम आहे.