पाकिस्तानात राहून आलेल्या व्यक्तीला मलंग गडावरून अटक, मुंबई पोलिसांसह मुंबई ATS कडून स्वतंत्र तपास
Individual who had been living in Pakistan arrested at Malang Gad; independent investigations being conducted by Mumbai Police and Mumbai ATS.
पाकिस्तानात वास्तव्य करून बनावट नावानं पाकिस्तानी पासपोर्ट काढणाऱ्या भारतीय इसमाला मलंगगडावर हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा मुंबई एटीएस कडूनही स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे. या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव किंवा ओळख पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही.