राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी सविस्तर इस्रायल हमास युद्धाला चौदा महिने उलटून गेलेत मात्र अजूनही एकमेकांवरचे हल्ले प्रतिहल्ले थांबलेले नाहीत. वृद्ध महिला लहान मुलं अशा सर्वांचा या हल्ल्यांमध्ये बळी जातोय. त्यातच गाझावरील इस्रायली हल्ल्यात काही पत्रकारही ठार झालेत यावरून इस्रायलवर जोरदार टीका होती आहे. नेमकं काय घडतंय उद्ध युद्धामध्ये पाहूया. हा आक्रोश सध्या गाझा पट्टीच्या नुसरत रिफ्युजी कॅम्प मध्ये रोजचाच झालाय. दर दिवशी होणाऱ्या इस्राइली हवाई हल्ल्यांमध्ये गाझा अक्षरशः बेचिराग होतय. यात अनेक लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत अनेकांचा बळी जातोय.