पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी आलेल्या तहसीलदार यांच्या समोरच दोन शेतकऱ्यांनी सरपंच महिलेस मारहाण केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील मासनपुर गावाच्या शिवारात घडलीय. महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्येस्व अभियान अंतर्गत'सेवा पंधरवडा' उपक्रमांतर्गत शेत रस्ते, पाणंद रस्त्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भोकरदन तालुक्यातील चोर्राळा-मासनपुर ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाने केल्या तक्रारी नंतर तहसीलदार या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले असताना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी महिला सरपंच यांना मारहाण केल्याची घटना घडलीय.तहसीलदार यांच्या समोरच ही घटना घडल्याने परिसरात एकच खबळ उडालीय....