मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. काही जातीच्या लोकांची बैठक घेऊन मराठा आरक्षणात (Maratha Reservation) फाटा पाडण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जर मुख्यमंत्र्यांनी जातीयवादी लोकांचे ऐकले तर परिणाम गंभीर होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच, काँग्रेस पक्ष सध्या मराठ्यांच्या विरोधात बोलत असल्याचा आरोप करत, "राहुल गांधी यांनी सांगितले की काय?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे त्वरित देण्याची त्यांची मागणी कायम आहे.