Ramdas Kadam vs Anil Parab | 'बायकोने जाळून घेतलं की जाळलं?', परबांचा कदमांवर वैयक्तिक हल्ला | NDTV

#AnilParab | #NarcoTest | #ShivsenaWar ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत गंभीर वैयक्तिक आरोप करत हल्ला चढवला आहे. रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या सनसनाटी दाव्यांना परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. १९९३ साली ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेतले होते. मात्र, त्यांनी स्वत:ला जाळले की त्यांना जाळण्यात आले?, याची सत्यता तपासण्यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट (Narco Test) करावी, अशी मागणी अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केली. नार्को टेस्ट शक्य नसल्यास, पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या वडिलांच्या 'उद्योगांची' चौकशी करावी, असे आव्हानही परब यांनी दिले आहे.

संबंधित व्हिडीओ