Kalwan Stone Pelting | आदिवासी आंदोलकांकडून कळवण पोलिस स्टेशनवर दगडफेक, पोलीस आणि पत्रकार जखमी

नाशिक जिल्ह्यातील कळवण पोलिस स्टेशनवर आज संतप्त आदिवासी आंदोलकांच्या (Tribal Protesters) जमावाने दगडफेक केल्याने एकच खळबळ उडाली. कळवण खुर्द येथील शेतमजूर विठोबा ग. पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करत, संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. याच आंदोलनात पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद होऊन दगडफेक झाली. या हिंसक घटनेत पोलिस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाले असून, पोलिस वाहनांच्या काचाही फुटल्या आहेत. पोलिसांनी अपहरणाच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संबंधित व्हिडीओ