Sangli|अंगावरील हळद उतरण्यापूर्वी जवान प्रजवल रुपनर देशसेवेसाठी रवाना, मुस्लिम बांधवांकडून सत्कार

लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या सांगलीच्या खंडेराजुरी येथील जवान प्रजवल रूपनर हा सीमेकडे रवाना झाला आहे...लग्ना होऊन अवघे 15 दिवस झालेले असताना भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजर राहण्याचे आदेश येताच प्रजवल हा अंगावरील हळद उतरण्या पुर्वीचा देश रक्षणासाठी पुन्हा सीमेवर परतला आहे,यावेळी मिरज रेल्वे स्थानकावरून रवाना होताना मिरजेतील मुस्लिम बांधवांकडून जवान प्रजवलचा सत्कार करण्यात आला,यावेळी भारत माताचे विजयाच्या घोषणा देत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत,देश रक्षणासाठी जवान प्रजवल रूपनरला शुभेच्छा देत रवाना करण्यात आले.

संबंधित व्हिडीओ