मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातल्या चारोटी येथे अती ज्वलनशील लिक्विड वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला.. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.. गुजरातहुन मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर चारोटी उड्डाण पूलाच्या कठड्याला टँकर धडकून हा अपघात झाला.. या अपघातानंतर टँकरमधून अचानक धूर निघू लागल्याने परिसरात केमिकल गळती आणि आगीच्या भीतीपोटी नागरिकांची मोठी धावपळ उडाली.. सुरक्षेचा उपाय म्हणून गुजरातकडून मुंबईकडे येणारी महामार्गाची वाहिनी त्वरित बंद करण्यात आलीय.. या भीषण अपघातात टँकरचा चालक आणि वाहक दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Major accident involving a tanker carrying flammable benzene; traffic disrupted on the Mumbai-Ahmedabad Highway.