Maval Rain| मावळ तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देवळे-मळवली परिसरात घरात शिरले पाणी | NDTV

मावळ तालुक्यात लोणावळा जवळील परिसरात सध्या जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.विशेषतः देवळे-मळवली रस्त्यालगत असलेल्या वसाहतीमध्ये पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.पावसाचे पाणी घरामध्ये घुसल्यामुळे नागरिक हैराण झाले असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होत आहे.स्थानिक प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने या समस्येकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संबंधित व्हिडीओ