Global News| अमेरिकेचा भारत-मध्य पूर्वेच्या प्रकल्पाला पाठिंबा, GCC बैठकीवेळी ट्रम्प यांची घोषणा

ट्रम्प यांनी जगात शांतता निर्माण केल्याचा दावा केला खरा, मात्र त्याच व्यासपीठावर फ्रेंच अध्यक्ष माक्राँ यांनी त्यांचा हा दावा खोडून काढला. विशेषतः गाझामध्ये २० कलमी कार्यक्रम राबवून शांतता प्रस्थापित केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र त्यावर फ्रेंच अध्यक्षांनी ट्रम्प यांचं नाव न घेता गाझामधील वास्तव जगासमोर मांडत शांततेसाठी अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी वेस्ट बँकेतील इस्रायली सैन्याच्या कारवाईचा ही एकप्रकारे निषेध करत जगानं त्याकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, भारताच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाची घडामोड या महासभेच्या बैठकी दरम्यान घडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभा बैठकीदरम्यान गल्फ कोऑपरेशन कौन्सिल आणि अरब देशांच्या नेत्यांसोबत एक बैठक घेतली. त्यात त्यांनी इंडिया-मिडिल ईस्ट-यूरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच IMEC या प्रकल्पाला जोरदार पाठिंबा दर्शवला. मध्य पूर्व भागातील ऊर्जा पायाभूत सुविधा आणि तेल पुरवठा मार्ग इराणच्या नियंत्रणाखालील किंवा प्रभावाखालील मार्गांपासून दूर नेण्याची गरज व्यक्त करताना त्यांना या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवलाय.

संबंधित व्हिडीओ