एमएसआरडीसी चा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव गेलेला आहे. सांगली कोल्हापूर मधील शेतकऱ्यांच्या विरोध नंतर गुंडाळण्यात आलेल्या नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरु झाल्या. तर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसी ने पर्यावरण विभागाच्या परवानगीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवलेला आहे आणि पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाला हिरवा कंदील मिळालेला आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनं त्यावेळी उपमुख्यमंत्री असताना, प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता आणि आता मात्र याच मार्गाला हिरवा कंदील मिळतोय.