भक्तीचा महाकुंभ, श्रद्धेचा कुंभ आस्थेचा कुंभ संत परंपरेचा कुंभ उत्तर प्रदेश मधल्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये आज महाकुंभाचा दिमाखदार शुभारंभ होतोय. आणि पहिलं शाही स्नान आज पार पडतंय. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पन्नास लाख भाविकांची, गर्दी झालेली पाहायला मिळते आहे. आजपासून महिनाभर महाकुंभ मेळा हा सुरु राहील तर तब्बल पन्नास लाख भाविकांनी आतापर्यंत या त्रिवेणी संगमावरती स्नान केलेलं आहे.