नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारातील एका हॉटेलवर सशस्त्र टोळक्यांनी हल्ला केला.हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला.हॉटेलात परत येऊ नको असं हॉटेल चालकाने ग्राहकाला सांगितल्यावर राग आल्याने रात्री 8 ते 10 साथीदारांसोबत हॉटेलची आणि वाहनांची तोडफोड केली.हातात चॉपर, धारदार शास्त्रे आणि काठ्या घेऊन मारहाण हॉटेल चालक आणि त्याच्या मुलाला मारहाण झाली.हॉटेल मालकाला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. घोटी पोलिसांनी यातील आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.