देशामधील मेट्रो लाईन्स दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत का? हा प्रश्न उपस्थित झालाय आणि त्याला कारण आहे एनआयए नं केलेली कारवाई पंजाब मधल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित तपास मुंबईमधल्या मेट्रो लाईन वर काम करणाऱ्या एका क्रेन ऑपरेटर पर्यंत येऊन पोहोचलाय. आता या दहशतवाद्यानं फरार झाल्यावर फक्त मेट्रो मार्गांवरच काम का केलं? मेट्रो मार्गांची रेकी करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू आहे का? मेट्रो च्या बाबतीत दहशतवाद्यांनी काही महत्त्वाची माहिती हस्तगत केली आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे.