3 ते 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी बंड केलं आणि महाराष्ट्रात 50 खोके एकदम ओकेची घोषणा जन्माला आली, त्यानंतर बदलत्या राजकीय घडामोडींनुसार ही घोषणा मागे पडली, पण तोवर शिंदे आणि त्यांच्या आमदारांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाईल तिथे या घोषणेनं अक्षरशः पिडलं, पण आता याच घोषणेचं भूत ऐन महापालिका निवडणुकीत जागं झालंय, काय म्हणालेयत राज ठाकरे यावर पाहुयात.