निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का, दगडू सकपाळ यांचा Shivsena मध्ये प्रवेश;Sanjay Raut काय म्हणाले?

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दक्षिण मुंबईतील उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडलं आहे..... गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख दगडू सकपाळ यांनी अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला....ऐन निवडणुकीच्या तोंडावर पडलेले हे खिंडार ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय मानले जात आहे....दगडू सकपाळ हे गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत.....लालबाग-परळ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांची मोठी पकड आहे....मात्र, आगामी निवडणुकीत आपल्या मुलीला पक्षाकडून उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती....पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आणि तिकीट नाकारल्याने ते प्रचंड नाराज होते....त्यांच्या या नाराजीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती, ज्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश झाला. दगडू सपकाळांच्या प्रवेशावरुन संजय राऊतांनी घणाघात केलाय....ते म्हणालेत जुने जाणते निष्ठावंत असतात ते पक्षांतर करत नाही, ज्याच्या मनात स्वार्थाचा अंकुर फुटतो ते जातात, एकनाथ शिंदे, राणे, भुजबळ, हे निष्ठावंतच होते..मात्र गेले अमित शहा यांचे बूट चाटायला अशी टीका संजय राऊतांनी केलीय...

संबंधित व्हिडीओ