देशभरातील आंदोलनासाठी रोज 3 हजार रुपये वाटप ?, Solapur चे पालकमंत्री Jaykumar Gore यांचा आरोप

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सध्या देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांवरून खळबळजनक विधान केले आहे. आंदोलनात बसणाऱ्या युवकांना रोज तीन हजार रुपये दिले जात असल्याचा दावा करत यामागे परदेशी शक्तीचा हात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. माळशिरस येथे पदवीधर आणि शिक्षक मेळाव्यात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरूणांवर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. आंदोलनामध्ये प्रत्येक अँगलने शूटिंग करून देशात खूप भयंकर घडतंय अशी परिस्थिती निर्माण केली जातेय.. भारत मजबूत होतोय, पण त्यात विघ्न आणण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. Rs 3,000 being distributed daily for protests across the country? Allegation by Solapur Guardian Minister Jaykumar Gore

संबंधित व्हिडीओ