सरसंघचालक मोहन भागवत आणि देशातले संतमहंत आमनेसामने आलेत. कारण आहे मोहन भागवतांनी केलेली काही विधानं देशातल्या प्रामुख्यानं उत्तर भारतात अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये सध्या जुन्या मशिदी आणि दर्ग्यांच्या जमिनी तसंच आस्थापनांवर हिंदू संघटना दावे करतायत. सरसंघचालकांनी मात्र काशी मथुरा सोडून इतर ठिकाणी असे दावे करणं थांबलं पाहिजे असं मत व्यक्त केलं मात्र संत महंतांना हे मत मान्य नाही.