शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं.राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे पत्र लिहिलंय. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. म्हणून शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या उपायोजनांची मागणी केलीय. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आलीय.