जळगाव जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. कापूस, सोयाबीन, मका यासह अन्य खरीप पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे... हाता-तोंडाशी आलेला घास पावसाअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत... शासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.
Jalgaon news No rain in Jalgaon for a month and a half; massive damage to maize, soybean, and cotton crops.