राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील पाच दिवसांत वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवतलाय.. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळाचे संकट तीव्र बनले आहे. याचदरम्यान पावसाच्या समाधानकारक हजेरीची शक्यता असल्याने दुष्काळी भागातील बळीराजाला दिलासा मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किमी वेगाचे वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे भाकीत केले आहे.
Rain Alert | Warning of rain accompanied by gusty winds for Maharashtra; 'Yellow Alert' for these districts over the next five days.