सध्या तुम्ही ज्याला मत देताय, तो त्याच पक्षात राहील याची काही शाश्वती नाही.... वैयक्तिक उमेदवाराचं सोडून द्या.... पण ज्या पक्षाला तुम्ही मत देताय तो पक्षही उद्या कुणाबरोबर युती करेल हेसुद्धा सांगता येत नाही... सगळ्याच पक्षांचं महापालिका निवडणुकीआधी एक आणि नंतर दुसरंच काहीतरी असं ठरलंय की काय..... कारण मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यासंदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलंय... जाधव यांच्या या वक्तव्यामुळे एक प्रश्न उपस्थित झालाय... तो म्हणजे भाजप आणि मनसेचं आधीच काही ठरलंय का....