Malegaon शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, टिपू सुलतान चौक परिसरात मिरवणुकीवर दगडफेक | NDTV
Tension in Malegaon city during Durga Visarjan procession; stones pelted at the procession in the Tipu Sultan Chowk area
वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास टिपू सुलतान चौक परिसरात मिरवणुकीतील गुलाल एका घरावर पडल्याने वादाची ठिणगी पडली आणि त्यानंतर मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. या घटनेनंतर दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन न करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुर्गा विसर्जन मिरवणूक पार पडली.