Nashik जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळ, नरहरी झिरवाळांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज मोठा गदारोळ झालाय. निफाड सहकारी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीचा मुद्दा सभासदांनी उपस्थित केला होता. मात्र, ऐनवेळी उपस्थित झालेल्या प्रश्नांवर चर्चा न करता सभा आटोपती घेण्यात आल्याचा आरोप सभासदांनी केला. यामुळे सभासद आणि जिल्हा बँकेच्या प्रशासकांमध्ये वादावादी झाली. यावेळी राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हेसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासमोरच सभासदांनी निफाड सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा लावून धरला.

संबंधित व्हिडीओ