चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंप्रमाणे तिथे तयार झालेलं डिपसीक हा AI प्लाटफॉर्मसुद्धा सस्ते का माल असल्याची खिल्ली अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनी उडवलीय. पॅरिसमध्ये आज AI शिखर परिषद सुरु झालीय. यावेळी अमेरिकेचे उपाराष्ट्रध्यक्ष जे डी व्हान्स यांनी AI तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या भांडवलाची चर्चा केली. आतापर्यंत असा समज होता की AI प्लाटफॉर्म तयार करण्य़ाठी अब्जावधी डॉलर खर्च करावे लागतात. पण साधारण पंधरवड्यापूर्वी चीनी AI प्लॅटफॉर्म 'डीप सीक'ने जगभरात खळबळ उडवून दिली. हा प्लॅटफॉर्म फक्त ५० कोटी डॉलरमध्ये तयार केल्याचं सांगितलं. तेव्हापासून अमेरिकन आयटी कंपन्यांनी AI साठी गुंतवलेले अब्जावधी डॉलर वाया जाण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळेच अमेरिकन उपाध्यक्षांचा तिळपापड झाल्याचं आजच्या विधानानं उघड आहे.