पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय. आका’ला संपवायचे आहे,’ असे विधान पवारांनी केल्यानंतर महेश लांडगे आणि अजित पवारांमध्ये चांगलीच जुंपलीय. अशातच महेश लांडेगे यांनी घोटाळ्यावर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय तर 'कोणी कितीही मोठा असू द्या ,मी गुंडगिरी मोडून काढतो असंही अजित पवार म्हणालेत.