जाहिरात

Snooker Video : 2 वर्षाच्या मुलानं केले 2 वर्ल्ड रेकॉर्ड, स्नूकर खेळण्याचं टॅलेंट पाहून दिग्गज खेळाडू अवाक

दोन वर्षाच्या चिमुकल्यानं स्नूकर खेळून दोन वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. त्याची स्नूकर खेळण्याची कला पाहून दिग्गज खेळाडूंना आश्चर्य वाटलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल..

Snooker Video : 2 वर्षाच्या मुलानं केले 2 वर्ल्ड रेकॉर्ड, स्नूकर खेळण्याचं टॅलेंट पाहून दिग्गज खेळाडू अवाक
Jude Owens Snooker Video

Jude Owens Snooker Video :  अवघ्या 2 वर्षांच्या जूड ओवेन्सची जगभरात चर्चा रंगली आहे. अनेकांना स्नूकर खेळायला आवडत असले, पण ओवेन्सचं स्नूकर खेळणं जगावेगळं..कारण तो फक्त छंद म्हणून स्नूकर खेळत नाही. लहान वयातच त्याने दोन विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. जूड हा बँक शॉट आणि स्नूकर शॉटमध्ये डबल पॉट करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने याची अधिकृत नोंदही केली आहे. 2 वर्षांची मुलं कार्टून पाहणे,रंग ओळखणे,ABCD शिकणे यापेक्षा जास्त काही करत नाहीत. पण इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहणारा 2 वर्षांचा जूड ओवेन्स हे सगळं करतोच पण त्याचबरोबर तो स्नूकरही खेळतो. त्याच्याकडे स्नूकर खेळण्याचा असा जबरदस्त टॅलेंट आहे, ज्यामुळे त्याच्या नावावर दोन जागतिक विक्रमांची नोंद झाली आहे. 

हे सगळं तेव्हा घडलं आहे जेव्हा तो स्नूकर टेबलवर उभाही राहू शकत नव्हता.व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, तो टेबलपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडताना किंवा कोणाच्या कुशीत बसून स्नूकरचा शॉट मारताना दिसतो.जूड ओवेन्सने 12 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वात कमी वयात पूलमध्ये बँक शॉट मारला. त्यापूर्वी फक्त 41 दिवसांपूर्वी तो स्नूकरमध्ये डबल पॉट करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला होता.

बँक शॉट (Bank Shot)

बँक शॉट म्हणजे  जेव्हा ऑब्जेक्ट बॉल (ज्यावर आपला स्ट्रोक असतो) पॉकेटमध्ये जाण्यापूर्वी एक किंवा अधिक रेल्सना (टेबलच्या कडा) लागतो आणि मग पॉकेटमध्ये जातो.

नक्की वाचा >> BOSS ला गंडवलं, ऑफिसमध्ये Netflix पाहण्यासाठी कर्मचाऱ्याने केला भन्नाट जुगाड, आजूबाजूच्या कोणालाही कळलंच नाही

डबल पॉट (Double Pot)

डबल पॉट म्हणजे  जेव्हा क्यू बॉलने (पांढरा बॉल) एकाच स्ट्रोकमध्ये दोन बॉल्सला पॉकेटमध्ये टाकले जाते.

इथे पाहा जूड ओवेन्सचा स्नूकर खेळतानाचा व्हिडीओ

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने 28 जानेवारी 2026 रोजी जूड ओवेन्सच्या दोन्ही विक्रमांची अधिकृत नोंद केली आहे. दोन ट्रिक शॉट्स करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून जूडचा समावेश झाला आहे. व्हिडिओमध्ये जूडला स्नूकर शॉट मारताना,उंच उडी मारून टेबलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

नक्की वाचा >>Explainer :  घाईगडबडीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय भीती होती?

स्नूकर आणि पूल हे दोन्ही खेळ दिसायला सारखे असतात.पण स्नूकर मोठ्या टेबलवर,लहान पण जास्त संख्येच्या चेंडूंनी खेळला जातो. क्यू बॉलने इतर चेंडूंना मारून,ठराविक क्रमाने त्यांना पॉकेटमध्ये टाकायचे असते. जूडचा व्हिडीओ एक्सवर व्हायरल होताच लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने म्हटलंय “लहान मुलांना शिकवणे सोपे असते.“जूडने एवढ्या लहान वयात हे कसे शिकले?",असाही प्रश्न एका यूजरने उपस्थित केला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com