जाहिरात

वर्गातील मुलींना खुश करण्यासाठी शाळकरी मुलानं केलं मोठं कांड! आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली

बालपणीचं जग हे वेगळंच असतं. कारण लहानपणी मनातील भावना खऱ्या असतात, हेतू चांगला असतो,पण समज कमी असते. पण 8 वर्षीय मुलानं असं काही केलं, ज्यामुळे सर्वच पालकांना धक्का बसला आहे.

वर्गातील मुलींना खुश करण्यासाठी शाळकरी मुलानं केलं मोठं कांड! आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली
8 Year Old Boy Gold Chain Viral News

School Child Shocking News : बालपणीचं जग हे वेगळंच असतं. कारण लहानपणी मनातील भावना खऱ्या असतात, हेतू चांगला असतो,पण समज कमी असते.पण चीनमध्ये घडलेल्या एका घटनेमुळं सर्वच पालकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका ८ वर्षांच्या मुलाने शाळेतील मैत्रीला खास बनवण्यासाठी असं पाऊल उचललं, हे पाहून त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला. या घटनेची इंटरनेटवर तुफान चर्चा रंगली असून मुलाचं संपूर्ण कुटुंब थक्क झाले आहेत. मुलानं असं कांड केलं की, त्याच्या पालकांना याबाबत थांगपत्ताही लागला नाही.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या शानदोंग प्रांतात हा विचित्र प्रकार घडला आहे. एका दिवशी त्या मुलाच्या आईला समजलं की, तिची लग्नाची सोन्याची चेन गायब आहे.चैन कुठेतरी घरात विसरली असेल, असं तिला सुरुवातीला वाटलं.पण तिचा संशय तेव्हा बळावला, जेव्हा मोठ्या मुलीनं या घटनेचा पर्दाफाश केला. एका मुलीनं त्या महिलेच्या मुलीला सांगितलं की,'तिच्या भावाने तिला एक सोन्याचा तुकडा गिफ्ट केला आहे'.त्यानंतरच या या घटनेचा ट्वीस्ट समोर आला.

नक्की वाचा >> अलिबागच्या 'या' पर्यटनस्थळी बिबट्याचा शिरकाव, 3 जणांवर हल्ला, 2 जखमी..व्हिडीओ पाहून थरकापच उडेल

CCTV फुटेजमध्ये सत्य आलं समोर

घरच्यांनी CCTV फुटेज तपासले आणि स्क्रीनवर एक सत्य उघडकीस आलं.या व्हिडीओत दिसत होतं की, तो मुलगा गुपचूप कपाटातून चेन काढत होता. त्यानंतर त्याने एका हातात प्लायर्स, दुसऱ्या हातात लायटर घेऊन चेनचे छोटे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते नीट जमलं नाही. नंतर त्याने चेन दाताने तोडण्याचा प्रयत्न केला.आपल्या मित्रांना महागडं गिफ्ट देण्यासाठी त्याने ही धडपड केली. 

Latest and Breaking News on NDTV

"मला माहितच नव्हतं हे सोनं आहे"

आईने मुलाला विचारलं,‘माहित आहे का सोनं किती महाग असतं?',मुलाने निरागसपणे उत्तर दिलं ‘नाही'. त्याला तर हेही आठवत नव्हतं की किती लोकांना त्याने सोन्याचे तुकडे दिले आणि उरलेले कुठे ठेवले? शेवटी फक्त एक छोटासा भाग मिळाला, बाकी सगळं गायब.

नक्की वाचा >> Viral Video: पायरीवरून उतरताना गर्लफ्रेंडचा चुकीचा अँगल शुट केला, हार्दिक पंड्या पापाराझींवर भडकला, म्हणाला...

नेमकी चूक कोणाची? मुलाची की पालकांची? 

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी म्हटलं आहे की, मुलांना योग्य शिक्षण द्यायला हवं.तर काहींनी मजेशीर कमेंट करत म्हटलं, कदाचित भविष्यात तीच मुलगी तुमची सून बनेल.तमुलं भावना लक्षात घेऊन अशाप्रकारे वागू शकतात.पण काय बरोबर आहे आणि काय चूक?याबाबत शिकवावं लागतं, असंही एका यूजरने म्हटलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com