जाहिरात
Story ProgressBack

Alexaच्या मदतीने माकडांपासून वाचवला 15 महिन्यांच्या बहिणीचा जीव, मुलीने लढवली भन्नाट शक्कल

पंकज ओझा यांच्या घरावर माकडांनी हल्ला केला, त्यावेळेस त्यांची 13 वर्षांची मुलगी निकिता व 15 महिन्यांची भाची या दोघी घरामध्ये होत्या.

Read Time: 2 min
Alexaच्या मदतीने माकडांपासून वाचवला 15 महिन्यांच्या बहिणीचा जीव, मुलीने लढवली भन्नाट शक्कल

Alexa News: धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे एकाच दिवशी सर्व कामे करणं शक्य देखील होत नाही. पण टेक्नोलॉजीच्या मदतीमुळे हल्ली कित्येक कामे अगदी काही मिनिटांमध्ये करणे सहजसोपे झाले आहे. आपल्यापैकी बरेच जण आता मोबाइल किंवा अन्य टेक्नोलॉजीची मोठ्या प्रमाणात मदत घेतात. एखाद्या संकटाचाही सामना करण्यास उपकरणांमुळे मदत मिळू शकते. याचेच उदाहरण उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले.

व्हॉइस असिस्टंट डिव्हाइस अ‍ॅलेक्सामुळे 13 वर्षीय मुलगी व 15 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव वाचण्यास मदत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. बस्ती जिल्ह्यातील विकास कॉलनीमधील रहिवासी पंकज ओझा यांच्या घरावर माकडांनी हल्ला केला. यावेळेस घरामध्ये त्यांच्या 13 वर्षीय मुलीसह 15 महिन्यांची भाची होती. दोघीही एकमेकांसोबत खेळत होत्या. याचदरम्यान माकडांनी किचनमध्ये शिरकाव केला.

'मै नागिन तू सपेरा'...नागीण डान्स करणाऱ्या महिलेला पाहून 2 जणांनी असं काही केलं... Video

माकडांना पाहताच निकिता पूर्णपणे घाबरली. पण प्रसंगावधान दाखवत तिने लगेचच अ‍ॅलेक्साला श्वानांच्या भुंकण्याचा आवाज प्ले करण्याचा आदेश दिला. आदेश मिळताच अ‍ॅलेक्सामधून श्वानांच्या भुंकण्याचा आवाज येण्यास सुरुवात झाली आणि मग काय श्वानांचा आवाज ऐकल्यानंतर माकडांनी तेथून पळ काढला. अशा पद्धतीने निकिताने स्वतःचा आणि आपल्या लहान बहिणीचा जीव वाचवला. 

Video: माय-लेकींच्या धाडसाला सलाम! घरात घुसलेल्या दरोडेखोरालाच भिडल्या CCTV मध्ये कैद झाला थरार

निकिताने दाखवलेल्या प्रसंगावधनाबाबत वडील म्हणाले...

या संपूर्ण प्रकरणाबाबत सांगताना निकिताचे वडील पंकज ओझा म्हणाले की, अ‍ॅलेक्साचा याहून अधिक चांगला वापर होऊ शकत नाही. पुढे त्यांनी असेही म्हटले की, अ‍ॅलेक्साच्या मदतीने मी अलार्म सेट करतो, गाणी ऐकतो, बातम्यांचाही आढावा घेतो. केवळ एका कमांडवर  इंटरनेटच्या मदतीने अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून जवळपास सर्वच माहिती मिळते. अशातच माझ्या मुलीने माकडांपासून स्वतःसह भाजीचा जीव वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने अ‍ॅलेक्साचा वापर केला, त्यामुळे मी फार प्रभावित झालो आहे.  

'Google चूक आहे' रस्ता चुकणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानिकांनी लावला बोर्ड!

Alexa म्हणजे नेमके काय?
इंटरनेटच्या मदतीने Alexa या उपकरणाचा वापर केला जातो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण Alexa या उपकरणामध्ये आपला दिनक्रम निश्चित करू शकता. गाणी-कविता ऐकू शकता, हवामानाच्या अंदाजाबाबत माहिती जाणून घेऊ शकता. इतकेच नव्हे तर व्हिडीओ देखील पाहू शकता. Alexa हे उपकरण आपल्या आवाजाच्या आदेशानुसार काम करते. हे उपकरण दोन प्रकारच्या मॉडेलमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एका प्रकारामध्ये केवळ स्पीकर तर दुसऱ्या मॉडेलमध्ये स्पीकर, स्क्रीन व कॅमेरा हे फीचर देण्यात आले आहेत.  

दरम्यान काही प्रकरणांमध्ये Alexa या उपकरणावर वादविवाद देखील सुरू असल्याचे पाहायला मिळते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination