Village Where Baby Born In 30 Days: इटलीतील अब्रूझो (Abruzzo) पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक छोटंसं गाव...पगलियारा देई मार्सी (Pagliara dei Marsi). असं या गावाचं नाव..येथील गल्लो गल्लीत माणसांचा आवाज नाही, तर फक्त मांजरांच्या पावलांची हलकी चाहूलच ऐकायला यायची. अनेक दशकं उलटली तरी एकही मुल जन्माला आलं नव्हतं.शाळा बंद होत्या,घरं रिकामी होती आणि गाव फक्त वृद्ध मंडळींच्या श्वासांवर टिकून होतं.पण मग मार्च 2025 मध्ये काहीतरी असं घडलं,ज्याने या गावाची ओळखच बदलून टाकली.पण 30 वर्षांनंतर इथे एका मुलीचा जन्म झाला. पण त्यानंतर असं काही घडलं, जे वाचून तुम्हीही थक्कच व्हाल.
जेव्हा पगलियारा देई मार्सीमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला,तेव्हा गावातील वृद्धांच्या डोळ्यांत अश्रू आले. कुणालाही वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यात पुन्हा एखाद्या नवजात बाळाची किलबिल ऐकायला मिळेल. लारा बुस्सी त्राबुको (Lara Bussi Trabucco)असं या बाळाचं नाव ठेवलं गेलं. लाराच्या जन्मामुळे गावाची लोकसंख्या वाढून ची ती जवळपास 20 पर्यंत पोहोचली. ही संख्या जरी कमी असली, तरी या गावासाठी ती एका ‘चमत्कार'पेक्षा कमी नव्हती.
नक्की वाचा >> Raigad News खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, कोणा कोणाला केली अटक?
बाळाच्या आई-वडिलांसाठीच आनंदाचा क्षण नव्हता, तर..
लाराचा जन्म फक्त तिच्या आई-वडिलांसाठी म्हणजेच चिंजिया त्राबुको आणि पाओलो बुस्सीसाठी आनंदाचा क्षण नव्हता, तर तो संपूर्ण गावाचा उत्सव ठरला. चर्चमध्ये झालेल्या तिच्या बाप्तिस्मा सोहळ्यात प्रत्येक गावकरी उपस्थित होता.जे लोक अनेक वर्षांपूर्वी गाव सोडून गेले होते,तेही परत आले. गंमत म्हणजे या सोहळ्यात गावातील प्रसिद्ध मांजरीदेखील जणू खास पाहुण्या म्हणून हजर झाल्या होत्या.
नक्की वाचा >> मीरा–भाईंदरमध्ये महायुती संकटात? "24 तासांत निर्णय घ्या, नाहीतर.." शिवसेनेच्या 'या' मंत्र्याचा भाजपला इशारा
पगलियारा देई मार्सी अनेक वर्षांपासून लोकसंख्या घटण्याच्या समस्येशी झुंजत होता. तरुण चांगल्या नोकऱ्या आणि सुविधांसाठी शहरांकडे निघून गेले.गावात ना रोजगार होता,ना वाहतुकीची चांगली सोय.इथे माणसांपेक्षा मांजरीच जास्त होत्या.पण लाराच्या जन्माने हा सन्नाटा मोडून काढला.सरकारी आकडेवारीनुसार,2024 मध्ये देशात फक्त 3,69,944 मुलांचा जन्म झाला.आतापर्यंतचा हा सर्वात कमी आकडा होता. 2025 च्या सुरुवातीच्या महिन्यांत परिस्थिती आणखी बिघडताना दिसली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world