Emotional Video : 'मर्द को भी दर्द होता है'; बोरीवली स्थानकावरील तरुणाचा 'तो' हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. 'पुरुषही रडतात आणि हे नॉर्मल आहे...' हा विचार समाजात रुजवणं अत्यंत आवश्यक आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Trending Emotional Video : स्त्रीया भरपूर बोलतात आणि मनभरून रडतातही. कुणाशीही भांडताना अनेकदा त्यांच्या डोळ्यात टचकण पाणी येतं. व्यक्त होण्यासाठी किंवा मनाचा निचरा करण्यासाठी रडणं हे अनेकांसाठी फायदेशीर ठरतं असं म्हणतात. मात्र हेच रडणं जर एखाद्या पुरुषाबाबत घडलं तर समाज त्याकडे भावनिक कमकुवत लक्षण असल्याचं मानतो. 'पुरुष कधी रडत नसतो...', 'मर्द को कभी दर्द नही होता' (Emotional Video) अशी समजूत समाजात पेरण्यात आली आहे. एखादा रडणारा पुरुष पाहिला तर तो आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटतो. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील बोरीवली स्टेशनवरील आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण स्टेशनवर बसून ओक्साबोक्शी रडतोय. आयुष्यातील संकटांशी लढताना त्याचा भावनांचा निचरा होण्यासाठी याची त्याला मदत होत असेल कदाचित. मात्र याचा संबंध त्याच्या खंबीरपणाशी नक्कीच नाही. 'पुरुषही रडतात आणि हे नॉर्मल आहे...' हा विचार समाजात रुजवणं अत्यंत आवश्यक आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Emotional Video : रात्री झोपला अन् उठलाच नाही..., रिक्षाचालकाने 27 वर्षांचा मुलगा गमावला; भावुक करणारी कहाणी

बोरीवली स्टेशनवर नेमकं काय घडलं? 

हा व्हिडिओ तिलक दुबे नावाच्या व्यक्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तिलकने हा व्हिडिओ शूट केला आहे. त्याने सांगितल्यानुसार,

मी बोरीवली स्थानकावर ट्रेनची वाट पाहत होतो. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर फार गर्दी नव्हती. माझी ट्रेन चुकली होती. पुढची ट्रेन येण्यासाठी अर्ध्या तासाचा अवकाश होता. त्यामुळे मी स्टेशनवर एका चेअरवर बसलो. मी माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर तिथं आणखी एक मुलगा बसला होता. तो शांत होता. तोही ट्रेनची वाट पाहत होता. त्याने डोकं खाली केलं...आणि अचानक त्याच्या डोळ्यातून पाणी घळगळू लागलं... तो रडत होता. डोळ्यांवर हात ठेवून....शांतपणे...कोणी येऊन त्याला विचारावं अशा पद्धतीचं ते रडणं नव्हतं. त्याच्या भावनांचा निचरा होत होता...मी त्याच्याजवळ गेलो. 'ठीक आहेस ना?' मी विचारलं... पण तो फारसा काही बोलला नाही...म्हणाला.. 'बस्स, काहीतरी आठवलं. मला विचारलं यासाठी थँक्यू.' यानंतर तो शांत झाला आणि समोरील रिकाम्या ट्रॅककडे एकटक पाहत होता. तो अशा ट्रेनची वाट पाहत होता जी कधीच येणार नव्हती.

मात्र एक गोष्ट मला जाणवली... पुरुषही रडतात. पण एकांतात.. ते मानसिकृष्ट्या कमकुवत नसतात  पण अनेकदा शांतता ही एकमेव भाषा आहे जी वेदना समजते. मी प्रार्थना करतोय की, या माणसाच्या आयुष्यातील सर्व वेदना दूर व्हाव्यात आणि त्याला सुख मिळावं.