Emotional Video Viral : आयुष्यात कधी काय होईल, काहीच सांगू शकत नाही. एखाद्याच्या असहाय्य व्यक्तीच्या आयुष्यात कधी कोणी आधार म्हणून उभं राहतं तर काहीचं चांगलं सुरू असलेलं आयुष्य अचानक उद्ध्वस्त होतं. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ही घटना एका रिक्षाचालक काकांची आहे. त्यांचा २७ वर्षांचा मुलगा त्यांना कायमचा सोडून गेला. रिक्षा चालक काकांचं हसतं-खेळतं आयुष्य कसं बदललं?
रिक्षा चालकाची भावुक करणारी कहाणी...
या व्हिडिओमध्ये तुम्ही रिक्षा चालक काकांना पाहू शकता. ते एका महिला ब्लॉगरला आपल्या आयुष्यातील दु:खद कहाणी सांगत आहेत. जी पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यातही पाणी तरळेल. काकांनी रिक्षा चालवून आपल्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. त्यांचा मोठा मुलगा सूरतमध्ये नोकरी करीत होता. काही दिवसांनी त्याने त्याच्या घरी भोपाळमध्ये नोकरीची ट्रान्सफर करून घेतली. सर्व काही ठीक सुरू होतं. त्याने कारही खरेदी केली होती. रिक्षा चालक काका आपल्या मुलाच्या लग्नाचं प्लानिंक करीत होते. मात्र एकेदिवशी मुलगा ऑफिसमधून घरी आला. त्याने व्यवस्थित जेवण केलं आणि झोपी गेला. मात्र ती त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र होती. कारण तो झोपला ते उठलाच नाही. झोपेतच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि काकांनी आपला २७ वर्षांचा मुलगा गमावला.
नक्की वाचा - Viral Video : मोठेपणी काय होणार? विद्यार्थ्याचं उत्तर ऐकताच वर्गशिक्षिकेने काढला पळ, पाहा Video
पाहा Video:
लोकांच्या डोळ्यात आलं पाणी...
काकांनी सांगितलं, आता कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही. मन इतर गोष्टीत लावायचं म्हणून रिक्षा चालवतो. मात्र घरातून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. आता घरात आम्ही तिघेजण असतो. काकांची कहाणी एकून लोक भावुक झाले. सुख यायला खूप वेळ लागतो, मात्र दु:खाचा एक क्षण येतो आणि सर्व उद्ध्वस्त करतो. तरुण मुलगा गमावल्याचं दु:ख मनात साठवून काका आपलं काम जीवाभावाने करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
