जाहिरात

बॉस असावा तर असा! ऑफिसमधील गर्भवती महिलेसाठी बॉसचं जबरदस्त सरप्राईज, Video तुफान व्हायरल

ऑफिसमध्ये नेहमीच भरपूर काम असतं. मात्र कामाच्या वेळातून थोडा वेळ काढून आपल्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी बॉसने जी काही धडपड केली त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. 

बॉस असावा तर असा! ऑफिसमधील गर्भवती महिलेसाठी बॉसचं जबरदस्त सरप्राईज, Video तुफान व्हायरल
सिर्फ काम नहीं, जज्बात भी हैं जरूरी...वायरल वीडियो देख आप भी कहेंगे- काश मेरा बॉस भी ऐसा होता

Surprise Baby Shower Office Video: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ऑफिस म्हणजे डेडलाइन, थकवा आणि बॉसची कट-कट. तर सोशल मीडियावर एक असं वृत्त व्हायरल झालं आहे, ज्यामध्ये माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. एका बॉसने आपल्या गर्भवती कर्मचारीसाठी कार्यालयात एक जबरदस्त सरप्राइज दिलं. एका बॉसने आपल्या कार्यालयातील गर्भवती कर्मचारीसाठी थेट डोहाळे जेवणाची पार्टी आयोजित केली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून या बॉसचं मोठं कौतुक केलं जात आहे. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल....(Baby shower in office video)

सोशल मीडियावर अनेकदा टॉक्सिक वर्क कल्चरच्या गोष्टी ऐकायला मिळतात. पण एक्सवर शेअर केलेल्या या व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, ऑफिसच्या कामाच्या गडबडीत अचानक आपल्यासाठी इतकं मोठं सरप्राईज पाहून त्या महिला कर्मचाऱ्याला धक्काच बसतो. ऑफिसमध्येच तिच्यासाठी खास सजावट आणि केक कापून सेलीब्रेशन केलं जातं. सर्वजण आवर्जुन तिच्यासाठी भेटवस्तूही आणतात. ऑफिसमध्ये नेहमीच भरपूर काम असतं. मात्र कामाच्या वेळातून थोडा वेळ काढून आपल्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी बॉसने जी काही धडपड केली त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. 

(डिस्क्लेमर: वरील माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओच्या आधारावर देण्यात आली आहे. NDTV मराठी याची पुष्टी करीत नाही.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com