ओन्ली फॅन्स' (OnlyFans) या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या ॲडल्ट स्टार लिली फिलिप्सने इंग्लंडमधील एका शांत आणि पॉश वस्तीत बंगला खरेदी केल्याने मोठी खळबळ माजली आहे. चेशायरमधील टार्विन (Tarvin) या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या भागात लिलीने 1.1 दशलक्ष पाउंड (सुमारे 11.5 कोटी रुपये) खर्चून पाच बेडरूमचा आलिशान बंगला विकत घेतला आहे. या गावात मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटीचे अनेक प्रसिद्ध फुटबॉलपटू वास्तव्यास असल्याने हा भाग अत्यंत प्रतिष्ठीत मानला जातो.
नक्की वाचा: जग हादरलं! स्विमिंग पुलमध्ये मुलींसोबत अंघोळ करतानाचे फोटो; एपस्टिन फाइल्समधून मोठी माहिती समोर
स्टंटबाज लिलीमुळे शेजारी हैराण
लिली फिलिप्स ही आपल्या आचरट दाव्यांमुळे सातत्याने चर्चेत असते. तिने गेल्या वर्षी एक दावा केला होता, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. तिने म्हटलं होतं की एका दिवसांत तिने 100 पुरुषांसोबत संगत राखली होती. ॲडल्ट फिल्म इंडस्ट्रीतून लिलीने चांगला पैसा कमावला असून या पैशातून तिने या उच्चभ्रू भागात आलिशान बंगला विकत घेतला आहे. मात्र, तिच्या आगमनामुळे या भागातील नागरिक आणि तिचे शेजारी भलतेच वैतागले आहेत.
शांत गावातील वातावरण ढवळून निघाले
टार्विन या गावाचा उल्लेख 'डोम्सडे बुक'मध्ये करण्यात आला होता. हे गाव अत्यंत शांत, शालीन आणि सुसंस्कृत मानले जाते. इथली लोकसंख्या 3 हजारापेक्षा कमी आहे. एका स्थानिक रहिवाशाने 'द सन' या वृत्तपत्राला लिलीच्या आगमनाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, "तिच्या येण्याने या शांत गावात एक वादळ आले आहे. ती येथेही आपले भलते सलते प्रकार सुरू करेल अशी आम्हाला भीती वाटते आहे."
नक्की वाचा: मल्लिका शेरावतने 'व्हाईट हाऊस'मध्ये ट्रम्प यांच्या ख्रिसमस डिनरला लावली हजेरी; "आमंत्रण कसं मिळालं?"...
लिलीने सोशल मीडियावर शेअर केला बंगल्याचा व्हिडीओ
लिलीने सोशल मीडियावर तिच्या नवीन घराचे व्हिडिओ शेअर केले आहेत. तिच्या घराबाहेर अॅस्टन मार्टिन आणि लँड रोव्हर डिफेंडरसारख्या महागड्या गाड्या उभ्या असल्याचेही दिसून आले आहे. लिलीने पुरुषांसोबत 'गंमत' करायला आवडते असे लिलीने कबूल केले आहे. यातून तिला दरमहा लाखो रुपयांची कमाई होत असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world