जाहिरात

Unique Demand: थारवरुन शेजाऱ्यांमध्ये वॉर! वकिलाने कोर्टात मागितली अजब-गजब परवानगी, वाचून हैराण व्हाल

वकील धर्मेंद्र सिंह रावत यांनी पोलिसांना लिहिलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Unique Demand: थारवरुन शेजाऱ्यांमध्ये वॉर! वकिलाने कोर्टात मागितली अजब-गजब परवानगी, वाचून हैराण व्हाल

Chandigarh Lawyer News:  शेजाऱ्यांमध्ये होणारे वादविवाद काही नवीन नाही. अनेक क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्यांमध्ये वाद होतात अगदी मारामारीही होते. मात्र आता पंजाबच्या चंदिगडमधून शेजाऱ्याच्या वादातील एक धक्कादायक आणि अजब गजब प्रकरण समोर आले आहे. ज्यामागची स्टोरी वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. काय आहे हा थार गाडीवरुन सुरु झालेला वॉर? वाचा... 

चंडीगढमध्ये एक अत्यंत धक्कादायक पण तितकाच चर्चेचा विषय ठरलेला एक अनोखा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे येथील पोलीस दलात खळबळ माजली आहे. एका वकिलाने थेट पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पाच पानी पत्र लिहून मला शेजाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी 'मारहाण करण्याची थप्पड मारण्याची' परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. वकील धर्मेंद्र सिंह रावत यांनी पोलिसांना लिहिलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

सरकारी कार्यालयातील भंगार विकून सरकार मालामाल! 7 'वंदे भारत' ट्रेन खरेदी करता येतील एवढी कमाई

वकील धर्मेंद्र सिंह रावत यांनी पोलिसांकडून ही मागणी करण्यामागे कारणही तेवढेच खास आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या २४ लाख रुपये किमतीच्या नव्या  थार गाडीचे  शेजारी वारंवार नुकसान करत आहे. वारंवार गाडीवर ओरखाडे मारले जात असल्याने, आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शेजारी माझ्या प्रगतीवर जळतो म्हणून तो मुद्दाम गाडीवर स्क्रॅच करत आहे. 

त्यांनी या संदर्भात जुलै महिन्यातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सोपवले होते. या फुटेजमध्ये शेजारी धारदार वस्तूने गाडीचे नुकसान करताना कथितरित्या दिसत आहे. तक्रार आणि पुरावे देऊनही पोलिसांनी एफआयआर  दाखल न केल्याबद्दल रावत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वकिलाने आपल्या पत्रात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५(बी) चा हवाला दिला आहे. हे कलम नागरिकांना आपले शरीर आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याचा अधिकार देते.

 रावत यांनी लिहिले आहे की, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे त्यांना स्वतःच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलणे भाग पडले आहे. मात्र, कोणताही हिंसक प्रकार करण्यापूर्वी ते पोलिसांची औपचारिक परवानगी घेतील आणि वरिष्ठ अधिकारी व माध्यमांना  कळवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच रावत यांनी स्वतःला 'शांतताप्रिय आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक' म्हटले असले  आहे. 

(नक्की वाचा-  संतापजनक! तापाने फणफणलेल्या नवऱ्याची सासरी बोलावून प्रियकराच्या मदतीने हत्या, असं फुटलं बिंग)

 या पत्रातून पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात कायदेशीर-व्यंग्यात्मक ( विरोध दर्शवला आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या  एका निर्णयाचा हवाला देत, पोलिसांनी संज्ञानेय गुन्ह्यांमध्ये एफआयआर नोंदवणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. कारवाई न झाल्यास, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मानसिक छळ आणि निष्काळजीपणासाठी कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे. वकिलाचे हे अनोखे पत्र कायद्याच्या आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com