जाहिरात

संतापजनक! तापाने फणफणलेल्या नवऱ्याची सासरी बोलावून प्रियकराच्या मदतीने हत्या, असं फुटलं बिंग

अरुण औषध घेतल्यानंतर झोपलेला असताना, पूनम आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याची गळा आवळून हत्या केली. त्यावेळी घरात इतर कोणीही उपस्थित नव्हते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

संतापजनक! तापाने फणफणलेल्या नवऱ्याची सासरी बोलावून प्रियकराच्या मदतीने हत्या, असं फुटलं बिंग

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला बायकोने प्रियकराच्या मदतीने संपवल्याची घटना फरीदाबादच्या एनआयटी परिसरातून समोर आली आहे. तापाने फणफणलेल्या नवऱ्याला उपचाराच्या बहाण्याने माहेरी बोलावले आणि तिथे आपल्या प्रियकराच्या मदतीने त्याची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणला गेल्या काही दिवसांपासून तीव्र ताप होता आणि त्याची प्रकृती ठीक नव्हती. गुरुवारी अरुणची पत्नी पूनम उपचाराच्या बहाण्याने त्याला एनआयटी-5 परिसरात असलेल्या तिच्या माहेरी घेऊन गेली. तेथे पूनमने तिच्या प्रियकराला बोलावून घेतले.

अरुण औषध घेतल्यानंतर झोपलेला असताना, पूनम आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याची गळा आवळून हत्या केली. त्यावेळी घरात इतर कोणीही उपस्थित नव्हते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

एक चूक आणि गुन्हा उघडकीस

अरुणची हत्या केल्यानंतर, पूनमने सासऱ्यांना फोन करून सांगितले की, 'अरुणचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे.' यावर विश्वास ठेवून जेव्हा कुटुंब घटनास्थळी पोहोचले, तेव्हा सूरजपाल यांनी पाहिले की, अरुणच्या गळ्यावर बेल्टने गळा घोटल्यासारख्या खोल जखमा होत्या. या गंभीर खुणांमुळे ही साधीसुधी नैसर्गिक मृत्यूची घटना नसून, हत्या असल्याचा संशय त्यांना आला. त्यांना पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

(नक्की वाचा - Beed News: 'तो' आरोपी, धनंजय मुंडे अन् पैशांची मागणी, जरांगेच्या मर्डर प्लॅनची आणखी एक बाजू, नवा ट्वीस्ट?)

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश कुमार यांनी सांगितले की, मृतकाच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पूनम आणि तिच्या प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पूनमला ताब्यात घेतले असून, तिने आपला गुन्हा कबूल केला आहे.

पोलिसांच्या तपासणीत उघड झाले आहे की, अरुण आणि पूनम यांचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला होता. मात्र लग्नानंतर लगेचच त्यांच्यात वाद सुरू झाले होते. पूनमच्या चौकशीतून अरुणच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. पोस्टमार्टम नंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com